Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 48
    ऋषिः - और्णवाभ ऋषिः देवता - यज्ञो देवता छन्दः - ब्राह्मी अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    4

    अव॑भृथ निचुम्पुण निचे॒रुर॑सि निचुम्पु॒णः। अव॑ दे॒वैर्दे॒वकृ॑तमेनो॑ऽयासिष॒मव॒ मर्त्यै॒र्मर्त्य॑कृतं पुरु॒राव्णो॑ देव रि॒षस्पा॑हि॥४८॥

    स्वर सहित पद पाठ

    अव॑भृ॒थेत्यव॑ऽभृथ। नि॒चु॒म्पु॒णेति॑ निऽचुम्पुण। नि॒चे॒रुरिति॑ निचे॒रुः। अ॒सि॒। नि॒चु॒म्पु॒ण इति॑ निऽचुम्पु॒णः। अव॑। दे॒वैः। दे॒वकृ॑त॒मिति॑ दे॒वऽकृ॑तम्। एनः॑। अ॒या॒सि॒ष॒म्। अव॑। मर्त्यैः॑। मर्त्य॑कृत॒मिति॒ मर्त्य॑ऽकृतम्। पु॒रु॒ऽराव्ण॒ इति पुरु॒ऽराव्णः॑। दे॒व॒। रि॒षः। पा॒हि॒ ॥४८॥


    स्वर रहित मन्त्र

    अवभृथ निचुम्पुण निचेरुरसि निचुम्पुणः । अव देवैर्देवकृतमेनो यासिषमव मर्त्यैर्मर्त्यकृतम्पुरुराव्णो देव रिषस्पाहि ॥


    स्वर रहित पद पाठ

    अवभृथेत्यवऽभृथ। निचुम्पुणेति निऽचुम्पुण। निचेरुरिति निचेरुः। असि। निचुम्पुण इति निऽचुम्पुणः। अव। देवैः। देवकृतमिति देवऽकृतम्। एनः। अयासिषम्। अव। मर्त्यैः। मर्त्यकृतमिति मर्त्यऽकृतम्। पुरुऽराव्ण इति पुरुऽराव्णः। देव। रिषः। पाहि॥४८॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 48
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (अवभृत) विद्या आणि धर्माचरणाने शुद्ध झालेल्या (निचुम्पुण) दृढतेने शब्दविद्या (व्याकरणादी) शिकविणार्‍या विद्वान महाशय, ज्याप्रमाणे मी (निचुंपुणः) ज्ञान देण्यासाठी (निघेरूः) सतत विद्येचा संग्रह करतो. (दैवैः) प्रकाशस्वरूप मन आणि इंद्रियांद्वारे (देवकृतम्) केलेल्या घडलेल्या (मर्त्यैः) मरणधर्मा (मर्त्यकृतम्) देहाने केलेल्याना घडलेल्या (एनः) पापांना (अनायासिषम्) नष्ट करून शुद्ध होतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील शुद्ध (असि) व्हा. (ज्ञान आणि विद्या शिविणार्‍याने वैदिक वा मानसिक पापापासून दूर असावे. त्याचे चारीत्र्य शुद्ध असावे) हे जगदीश्‍वरा, तू मला त्याला व आम्हाला (पुरूरावाः) अत्यंत दुःखदायक अशा (रिषः) शत्रूपासून अथवा पापापासून (पाहि) वाचव. (ज्ञान, विज्ञान शिकविणार्‍या आम्हांपासून पापभावना व दुष्कर्म दूर राहावेत)॥48॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुब्तोपमालंकार आहे. मनुष्यांकरिता हे उचित आहे की पापापासून निवृत्ती मिळण्याकरीता आणि धर्माच्या वृद्धीकरिता सदा परमेश्‍वराची प्रार्थना करावी. मन, वाणी व देहाने जे पाप घडवतात, त्यांच्यापासून दूर राहावे व जर अज्ञानामुळे एखादे पाप घडले असेल, तर त्याचे परिणाम म्हणजे दुःखप्राप्ती असा विचार करून तसे पाप दुसर्‍यांदा करू नये. पुढे सदा सर्वकाळी शुद्धकर्म करण्यासाठी तत्पर रहावे व सावध असावे. ॥48॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top