Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 23
    ऋषिः - वैश्वामित्रो मधुच्छन्दा ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराट् गायत्री, स्वरः - षड्जः
    2

    राज॑न्तमध्व॒राणां॑ गो॒पामृ॒तस्य॒ दीदि॑विम्। वर्द्ध॑मान॒ꣳ स्वे दमे॑॥२३॥

    स्वर सहित पद पाठ

    राज॑न्तम्। अ॒ध्व॒राणा॑म्। गो॒पाम्। ऋ॒तस्य॑। दीदि॑विम्। वर्ध॑मानम्। स्वे। दमे॑ ॥२३॥


    स्वर रहित मन्त्र

    राजन्तमध्वराणाङ्गोपामृतस्य दीदिविम् । वर्धमानँ स्वे दमे ॥


    स्वर रहित पद पाठ

    राजन्तम्। अध्वराणाम्। गोपाम्। ऋतस्य। दीदिविम्। वर्धमानम्। स्वे। दमे॥२३॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 23
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (नम:) अन्नाद्वारे (भरत:) पोषण घेत व शक्ती धारण करून आम्ही (धिया) बुद्धीने व कर्माने परमेश्‍वराचे नित्य ध्यान करतो. तो परमेश्‍वर (अध्वराणाम्) अग्निहोत्रापासून अश्‍वमेध यज्ञापर्यंत सर्व यज्ञांचे रक्षण तसेच (गोपाम्) इन्द्रियांचे आणि पृथ्वी आदीचे रक्षण करतो. तो (राजन्तम्) प्रकाशमान आहे (ऋतस्य) अनादि सत्यस्वरूप व सर्वांचे कारण आहे. (दीदिविम्) व्यवहार व कार्यासाठी (स्वे) आपल्या (दमे) मोक्षरूप स्थानांत (वर्धमानम्) वृद्धीस प्राप्त होणार्‍या परमेश्‍वराचे (उपभसि) आम्ही नित्य ध्यान करतो. ॥1॥ दुसरा अर्थ (अग्नीपरक) ज्या परमेश्‍वराने (अध्वराणाम्) शिल्पविद्येने साध्य होणार्‍या यज्ञासाठी (गोपाम्) पशु आदींचे रक्षण करण्यासाठी (ऋतस्य) जलाच्या प्राप्तीसाठी (दीदिविम्) तसेच लौकिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी ज्या अग्नीला (स्वे) त्याच्या स्वत:च्या (यमे) विशिष्ट शांतरूपांत ठेवले आहे व जो वेळोवेळी वरील कार्यासाठी (वर्धमानम्) वृद्धीस प्राप्त होतो व प्रकट होतो, अशा त्या अग्नीला (नम:) विशिष्ट योग्य क्रियांद्वारे (भरत:) संपन्न करीत (धिया) बुद्धी, तंत्र-शास्त्र आदी प्रयोगाने (उपैमसि) आम्ही नित्य प्राप्त करतो. (योग्य तंत्र व रीती वापरून त्यापासून लाभ घेतो) ॥23॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात श्‍लेषालंकार आहे. तसेच या मंत्रात नमः, भरंतः, धिया, उप, आ, इमसि, पूर्वीच्या मंत्रापासून या सहा शब्दांची अनुवृत्ती घेतली आहे (म्हणजे हे सहा शब्द या मंत्रात नाहींत, पण पूर्वीच्या मंत्रातून (स ँ्हितासि.....) हे शब्द संदर्भ व अर्थपूर्ती साठी घेतले आहेत.) परमेश्‍वर आदिरहित म्हणजे अनादि आहे, तो कारणरूपाने सत्य व नित्य आहे आणि तोच समस्त सृष्टी रचनादी कार्य करीत असतो. त्याचप्रमाणे भौतिक अग्नी देखील जगाला जलाची प्राप्ती करून देतो आणि त्याद्वारे सर्व संसारिक कार्य व व्यवहार पूर्ण होतात. सर्व मनुष्यांनी हे यथार्त सत्य अवश्य जाणावे. ॥23॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top