Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 63
    ऋषिः - नारायण ऋषिः देवता - रुद्रो देवता छन्दः - भूरिक् जगती, स्वरः - निषादः
    2

    शि॒वो नामा॑सि॒ स्वधि॑तिस्ते पि॒ता नम॑स्तेऽअस्तु॒ मा मा॑ हिꣳसीः। निव॑र्त्तया॒म्यायु॑षे॒ऽन्नाद्या॑य प्र॒जन॑नाय रा॒यस्पोषा॑य सुप्रजा॒स्त्वाय॑ सु॒वीर्या॑य॥६३॥

    स्वर सहित पद पाठ

    शि॒वः। नाम॑। अ॒सि॒। स्वधि॑ति॒रिति॒ स्वऽधि॑तिः। ते॒। पि॒ता। नमः॑। ते॒। अ॒स्तु॒। मा। मा॒। हि॒ꣳसीः॒। नि। व॒र्त्त॒या॒मि॒। आ॑युषे। अ॒न्नाद्या॒येत्य॑न्न॒ऽअ॒द्याय॑। प्र॒जन॑ना॒येति प्र॒ऽजन॑नाय। रा॒यः। पोषा॑य। सु॒प्र॒जा॒स्त्वायेति॑ सुप्रजाः॒ऽत्वाय॑। सु॒वीर्य्या॒येति॑ सु॒ऽवीर्य्या॑य ॥६३॥


    स्वर रहित मन्त्र

    शिवो नामासि स्वधितिस्ते पिता नमस्ते अस्तु मा मा हिँसीः । निवर्त्तयाम्युषे न्नाद्याय प्रजननाय रायस्पोषाय सुप्रजास्त्वाय सुवीर्याय ॥


    स्वर रहित पद पाठ

    शिवः। नाम। असि। स्वधितिरिति स्वऽधितिः। ते। पिता। नमः। ते। अस्तु। मा। मा। हिꣳसीः। नि। वर्त्तयामि। आयुषे। अन्नाद्यायेत्यन्नऽअद्याय। प्रजननायेति प्रऽजननाय। रायः। पोषाय। सुप्रजास्त्वायेति सुप्रजाःऽत्वाय। सुवीर्य्यायेति सुऽवीर्य्याय॥६३॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 63
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे जगदीश्‍वर अथवा हे उपदेशक विद्वान् (सर्वांना हितोपदेश करणारे हे सर्वज्ञानी परमेश्‍वर) आपण (स्वधितिः) अविनाशित्व गुणांमुळे वज्रमय (वृढतम) (असि) आहात. (ते) आपले (शिवः) सुखस्वरूप विज्ञान प्रदाता (नाम) नांव (असि) आहे (आपले नांव सुख आणि ज्ञान देणारे आहे)(ते) आपणांस माझा (नमः) आदरपूर्ण नमस्कार असो. आपण (मा) मला (मा) नका (हि ्ँ सीः) मारू, म्हणजे मला अल्पायू करू नका. (अपमृत्युच्या आहारी जाऊ देऊ नका) याकरिता मी (आयुषे) पूर्ण आयुष्याचा उपभोग घेण्यासाठी (अन्नाद्याय) अन्नादीच्या सेवनासाठी, (सुप्रजास्त्वा) उत्तम पुत्रादी संतती वा चक्रवर्ती राज्याच्या प्राप्तीसाठी (सुवीय्याम) शारीरिक, आत्मिक शक्तीच्या प्राप्तीसाठी व बल-पराक्रम करण्यासाठी तसेच (रायस्पोषाय) विद्या व सुवर्ण आदी धनाच्या वृद्धीसाठी (वर्तमामि) योग्य प्रकारे आचरण करतो व प्रार्थना करतो की आपण मला याच रीतीने आचरण करण्यासाठी प्रवृत्त करा. याप्रकारे वागणूक ठेऊन मी सर्व दुःखापासून मुक्ती मिळवीन व आत्म्यात आपणांस उपास्यदेव म्हणून ठरवून आपल्या अंतर्यामित्वाच्या आश्रयाखाली राहून सर्वांशी सदा-सर्वदा, योग्य प्रकारे वागेन/वागत आहे. ॥63॥

    भावार्थ - भावार्थ - मंगलमय, सर्वपालक परमेश्‍वराच्या आज्ञेचे पालन केल्याशिवाय कोणीही माणूस या संसारात सुखी शकत नाही व परलोकी ही सुख प्राप्त करण्यात समर्थ होत नाही. कोणीही नास्तिक पक्ष स्वीकारून ईश्‍वराचा अनादर (उपेक्षा वा निषेध) करूं नये. जो नास्तिक होऊन ईश्‍वराचा अनादर करतो, त्याचा सर्वत्र अनादर होतो. म्हणून सर्व मनुष्यांनी ईश्‍वराविषयी अस्तिकतेची बुद्धी ठेऊन त्याची उपासना अवश्य करावी. ॥62॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top