Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 3/ मन्त्र 50
    ऋषिः - और्णवाभ ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - भूरिक् अनुष्टुप्, स्वरः - गान्धारः
    3

    दे॒हि मे॒ ददा॑मि ते॒ नि मे॑ धेहि॒ नि ते॑ दधे। नि॒हारं॑ च॒ हरा॑सि मे नि॒हारं॒ निह॑राणि ते॒ स्वाहा॑॥५०॥

    स्वर सहित पद पाठ

    दे॒हि। मे॒। ददा॑मि। ते॒। नि। मे॒। धे॒हि॒। नि। ते॒। द॒धे॒। नि॒हार॒मिति॑ नि॒ऽहार॑म्। च॒। हरा॑सि। मे॒। नि॒हार॒मिति॑ नि॒ऽहार॑म्। नि। ह॒रा॒णि॒। ते॒। स्वाहा॑ ॥५०॥


    स्वर रहित मन्त्र

    देहि मे ददामि ते नि मे धेहि नि ते दधे । निहारञ्च हरासि मे निहारन्निहराणि ते स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    देहि। मे। ददामि। ते। नि। मे। धेहि। नि। ते। दधे। निहारमिति निऽहारम्। च। हरासि। मे। निहारमिति निऽहारम्। नि। हराणि। ते। स्वाहा॥५०॥

    यजुर्वेद - अध्याय » 3; मन्त्र » 50
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मित्रा, तू (स्वाहा) तुझे मन जे म्हणत आहे म्हणजे तुझ्या मनात जे आहे, त्याप्रमाणे (मे) तू मला ही वस्तू (देहि) दे, तसेच मी (ते) मनात ठरविले आहे ती वस्तू (दादामि) देत आहे किंवा देईन. तू (मे) माझी ही वस्तू (निधेही) धारण कर वा माझ्याकडून घे आणि (ते) तुझी वस्तू मी (निदघे) धारण करीन किंवा घेईन. (मे) तू माझ्याकडून (निहारम्) मोल देऊन विकत घेण्यायोग्य वस्तू (हरासि) घे आणि मी (ते) तुला (निहारम्) त्या वस्तूचे योग्य ते मोल घेऊन (निहराणि) अवश्य देईन. (स्वाहा) अशा प्रकारचे देवाण घेवाणीचे सर्व व्यवहार लोकांनी प्रामाणिकपणें व चोखपणे करावेत, अन्यथा लोक-व्यवहार किंवा जमातीतील कामकाज चालू शकत नाही ॥50॥

    भावार्थ - भावार्थ - सर्व माणसांनी वस्तू देणे-घेणें, वस्तू ठेवणे अगर ठेवविणें अथवा सांभाळून ठेवणे, हे सर्व व्यवहार सत्याने, प्रामाणिकपणे करावेत. उदाहरणार्थ - एकाने दुसर्‍या माणसास सांगितले ‘ही वस्तू तू मला दे’, ‘ही वस्तू मी तूला देत नाही अथवा देणार नाही’ तर त्या पहिल्या माणसाने जसे सांगितले, तसेच करावे. त्याप्रमाणे एकाने दुसर्‍यास सांगितले “माझी ही वस्तू तू तुझ्याजवळ ठेव. मी जेव्हां मागेन, तेव्हां मला परत दे’ दुसरा माणूस म्हणाला ‘ठीक आहे, तुझी वस्तू मी ठेऊन घेतो. तू जेव्हां परत मागशील, तेंव्हां तुला देईन, अथवा ‘मी तुझ्याजवळ येईन, व परत देईन’ किंवा ‘तू माझ्याकडे येऊन घेऊन जा’ असे सर्व वचन, सर्व व्यवहार सत्यानेच करावेत. अशा प्रामाणिक व्यवहारांशिवाय कोणाची कार्य सिद्धी होत नाही व त्यास प्रतिष्ठा ही मिळत नाही. प्रतिष्ठा व कार्यपूर्ती यांशिवाय कोणीही माणूस सुखी राहू शकत नाही. ॥50॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top