Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 18/ मन्त्र 41
    ऋषिः - देवा ऋषयः देवता - वातो देवता छन्दः - ब्राह्म्युष्णिक् स्वरः - ऋषभः
    2

    इ॒षि॒रो वि॒श्वव्य॑चा॒ वातो॑ गन्ध॒र्वस्तस्यापो॑ऽअप्स॒रस॒ऽऊर्जो॒ नाम॑। स न॑ऽइ॒दं ब्रह्म॑ क्ष॒त्रं पा॑तु॒ तस्मै॒ स्वाहा॒ वाट् ताभ्यः॒ स्वाहा॑॥४१॥

    स्वर सहित पद पाठ

    इ॒षि॒रः। वि॒श्वव्य॑चाः। वातः॑। ग॒न्ध॒र्वः। तस्य॑। आपः॑। अ॒प्स॒रसः॑। ऊर्जः॑। नाम॑। सः। नः॒। इ॒दम्। ब्रह्म॑। क्ष॒त्रम्। पा॒तु॒। तस्मै॑। स्वाहा॑। वाट्। ताभ्यः॑। स्वाहा॑ ॥४१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    इषिरो विश्वव्यचा वातो गन्धर्वस्तस्यपोऽअप्सरसऽऊर्जा नाम । स नऽइदम्ब्रह्म क्षत्रम्पातु तस्मै स्वाहा वाट्ताभ्यः स्वाहा ॥


    स्वर रहित पद पाठ

    इषिरः। विश्वव्यचाः। वातः। गन्धर्वः। तस्य। आपः। अप्सरसः। ऊर्जः। नाम। सः। नः। इदम्। ब्रह्म। क्षत्रम्। पातु। तस्मै। स्वाहा। वाट्। ताभ्यः। स्वाहा॥४१॥

    यजुर्वेद - अध्याय » 18; मन्त्र » 41
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, जो हा पवन (वायू) आहे, त्याची (इषिर:) सर्वजण इच्छा करतात, (विश्वव्यचा:) समग्र संसारामधे व्याप्त असून तो (गन्धर्व:) पृथ्वीला व सूर्यकिरणांना धारण करतो (पृथ्वीवरील जीव, वनस्पती आदी वायूमुळेच विद्यमान वा जीवित आहेत) तो (वात:) सर्वत्र संचार करणारा आहे. (तस्य) त्या वायूचे जे (आष:) जल तसेच प्राण, अपान, उदान, व्यान, समान आदी भाग आहेत, ते (अप्सरस:) अंतरिक्षात वा अंतरिक्षस्थ जलात येणारे जाणारे आहेत आणि त्यांचे (ऊर्ज:) बळ व पराक्रम (नाम) जगात प्रसिद्ध आहेत (सर्वजण प्राणादी वायूची शक्ती ओळखतात) ज्याप्रमाणे (स:) तो वायू (न:) आम्ही सर्वांसाठी तसेच (इदम्) या (ब्रह्म) सत्योपदेशाद्वारा सर्वांची उन्नत्ती करणार्‍या ब्राह्मण वंशाचे आणि (क्षत्रम्) विद्याप्रिय राजकुळाचे (पातु) रक्षण करो. तुम्ही देखील त्याप्रमाणे वायूद्वारे आपले रक्षण करा व त्याप्रमाणे आचरण करा. (तस्मै) म्हणून त्या पवनासह (स्वाहा) उत्तम क्रिया करा (वाट्) त्यांची प्राप्ती करा आणि (ताभ्य:) त्या जल, वायू आग्नीकरिता (स्वाहा) उत्तम वचन बोला आणि उत्तम क्रिया करा (त्यापासून लाभ घ्या) ॥41॥

    भावार्थ - भावार्थ - शरीरात जितक्या क्रिया, शक्ती आणि पुरुषार्थ आदी कर्म होतात ते सर्व पवनामुळे होतात तो वायू सर्वांचा प्राणरुप असून जल अर्थात गंधर्व म्हणजे वायू व जल सर्वांना धारण करणारे आहेत. सर्व मनुष्यांनी हे जाणले पाहिजे ॥41॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top