यजुर्वेद - अध्याय 18/ मन्त्र 75
ऋषिः - उत्कील ऋषिः
देवता - अग्निर्देवता
छन्दः - आर्षी त्रिष्टुप्
स्वरः - धैवतः
4
व॒यं ते॑ऽअ॒द्य र॑रि॒मा हि काम॑मुत्ता॒नह॑स्ता॒ नम॑सोप॒सद्य॑। यजि॑ष्ठेन॒ मन॑सा यक्षि दे॒वानस्रे॑धता॒ मन्म॑ना॒ विप्रो॑ऽअग्ने॥७५॥
स्वर सहित पद पाठव॒यम्। ते॒। अ॒द्य। र॒रि॒म। हि। काम॑म्। उ॒त्ता॒नह॑स्ता॒ इत्यु॑त्ता॒नऽह॑स्ताः। नम॑सा। उ॒प॒सद्येत्यु॑प॒ऽसद्य॑। यजि॑ष्ठेन। मन॑सा। य॒क्षि॒। दे॒वान्। अस्रे॑धता। मन्म॑ना। विप्रः॑। अ॒ग्ने॒ ॥७५ ॥
स्वर रहित मन्त्र
वयन्तेऽअद्य ररिमा हि काममुत्तानहस्ता नमसोपसद्य । यजिष्ठेन मनसा यक्षि देवानस्रेधता मन्मना विप्रो अग्ने ॥
स्वर रहित पद पाठ
वयम्। ते। अद्य। ररिम्। हि। कामम्। उत्तानहस्ता इत्युत्तानऽहस्ताः। नमसा। उपसद्येत्युपऽसद्य। यजिष्ठेन। मनसा। यक्षि। देवान्। अस्रेधता। मन्मना। विप्रः। अग्ने॥७५॥
विषय - पुरुषार्थाद्वारे काय प्राप्त करावे, याविषयी -
शब्दार्थ -
शब्दार्थ - (सामाजिक जन विद्वानाला उद्देशून हे (अग्ने) विद्वान महोदय, (वयम्) आम्ही (उत्तानहस्ता:) उत्तमरीत्या हा उंचावून (तुम्हाला आशीषर्वचन) वा अभय देत आहोत. आणि (ते) तुमचा (नमसा) सत्कार करण्यासाठी (उपसघ) तुमच्याजवळ येतो आणि (अद्य) आज वा तुरत (कामय्) तुमच्या कामनेला (हि) अवश्यमेव (ररिम) समर्थन वा बळ देतो (तुच्या इच्छित योजनांना वा उपक्रमांना पाठिंबा देतो) तसेच (विप्र:) बुद्धिमान आणि (अस्रेधताँ) इकडे-तिकडे न जाणार्या स्थायी अशा (मन्ममा) तुमच्या शक्तीने आणि (यजिष्ठेन) अत्यंत संयमपूर्ण अशा (मनसा) मनाने (देवान्) विद्वानांजन आणि शुभगुण यांना प्राप्त करता (आपल्याशक्ती आणि चिंतनाद्वारे विद्वानांना एकत्रित करता) आणि (यक्षि) शुभकर्म करण्याकडे प्रवृत्त होता, तद्वत आम्ही सर्व समाजजनांनी देखील व्हायला हवे ॥75॥
भावार्थ - भावार्थ - जे लोक पुरुषार्थ-परिणामाद्वारे आपल्या कामना पूर्ण करतात, त्यांनी विद्वानांचा संग देखील अवश्य करावा (त्यांचे सुयोग्य मार्गदर्शन घ्यावे) आणि अशाप्रकारे आपल्या उद्दिष्टात यशस्वी व्हावे. ॥75॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal