Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 18/ मन्त्र 58
    ऋषिः - विश्वकर्मा ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृदार्षी जगती स्वरः - निषादः
    2

    यदाकू॑तात् स॒मसु॑स्रोद्धृ॒दो वा॒ मन॑सो वा॒ सम्भृ॑तं॒ चक्षु॑षो वा। तद॑नु॒ प्रेत॑ सु॒कृता॑मु लो॒कं यत्र॒ऽऋष॑यो ज॒ग्मुः प्र॑थम॒जाः पु॑रा॒णाः॥५८॥

    स्वर सहित पद पाठ

    यत्। आकू॑ता॒दित्याऽकू॑तात्। स॒मसु॑स्रो॒दिति॑ स॒म्ऽअसु॑स्रोत्। हृ॒दः। वा॒। मन॑सः। वा॒। सम्भृ॑त॒मिति॒ सम्ऽभृ॑तम्। चक्षु॑षः। वा॒। तत्। अ॒नु॒प्रेतेत्य॑नु॒ऽप्रेत॑। सु॒कृता॒मिति॑ सु॒कृता॑म्। ऊ॒ऽइत्यूँ॑। लो॒कम्। यत्र॑। ऋष॑यः। ज॒ग्मुः। प्र॒थ॒म॒जाः। पु॒रा॒णाः ॥५८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यदाकूतात्समसुस्रोद्धृदो वा मनसो वा सम्भृतञ्चक्षुषो वा । तदनु प्रेत सुकृतामु ओल्कँयत्रऽऋषयो जग्मुः प्रथमजाः पुराणाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    यत्। आकूतादित्याऽकूतात्। समसुस्रोदिति सम्ऽअसुस्रोत्। हृदः। वा। मनसः। वा। सम्भृतमिति सम्ऽभृतम्। चक्षुषः। वा। तत्। अनुप्रेतेत्यनुऽप्रेत। सुकृतामिति सुकृताम्। ऊऽइत्यूँ। लोकम्। यत्र। ऋषयः। जग्मुः। प्रथमजाः। पुराणाः॥५८॥

    यजुर्वेद - अध्याय » 18; मन्त्र » 58
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - सत्य आणि असत्य यातील भेद जाणू इच्छिणार्‍या (सत्यान्वेषी) लोकहो, तुम्ही (यत्) जे काही (आकूणत्) उत्साहाने (हृद:) आत्मा (वा) प्राण (मनस:) मन (वा) अथवा बुद्धी आदीद्वारे (जाणू इच्छिता) ते (चक्षुष:) नेत्रादी इंद्रियांपासून उत्पन्न प्रत्यक्ष आदी प्रमाणांनी (वा) अथवा कान आदी इंद्रियांनी (संभृतम्) चांगल्याप्रकारे जाणलेले आह की नाही, म्हणजे निश्चयपूर्वक योग्य वा सत्य तेच ऐकले, पाहिले वा अनुमानित केले आहे (की नाही, याविषयी खात्री करून घ्या आणि मग तेच सत्य माना) (तत्) ते सत्यज्ञान (समसुस्रोत्) तुम्हाला उचितप्रकारे प्राप्त होवो. (या सत्यप्राप्तीसाठी) (प्रथमजा:) आमच्या-तुमच्यापेक्षा पूर्वी जन्मलेले तसेच (पुराणा:) खूप जुन्या काळी झालेले (ऋषय:) वेदवित् परमयोगी ऋषिजम (यत्र) जेथे (जग्मु:) पोहचले, त्या (सुकृताम्) सुकृताचे फळ म्हणजे मोक्ष इच्छिणार्‍या सज्जनांच्या (लोकम्) प्रत्यक्ष सुखसमूहाला अथवा मोक्षपदाला तुम्ही (अनुप्रेत) योग्यप्रकारे जा वा प्राप्त करा ॥58॥

    भावार्थ - भावार्थ - जेव्हां मनुष्याला सत्यासत्यविषयी भेद जाणण्याची इच्छा उत्पन्न होईल (अथवा सत्य काय हे जाणण्याची इच्छा होईल) तेव्हां त्याने ईश्वराचे गुण, कर्म आणि स्वभाव यांचा विचार करावा, तसेच सृष्टिक्रम, प्रत्यक्ष आदी आठ प्रमाणांनी खात्री करावी, सज्जनांचे आचरण पहावे (व तेच सत्य जाणावे) तसेच या व्यतिरिक्त आपली आत्मा आणि मन जे म्हणेल, ते ते सत्य मानावे आणि जे त्याहून विपरीत असेल ते असत्य समजावे. जे लोक अशा पद्धतीने नीट परीक्षा करून धर्माचरण करतात, ते अत्यंत सुख प्राप्त करतात ॥58॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top