Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 40
    ऋषिः - अप्रतिरथ ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - विराडार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    इन्द्र॑ऽआसां ने॒ता बृह॒स्पति॒र्दक्षि॑णा य॒ज्ञः पु॒रऽए॑तु॒ सोमः॑। दे॒व॒से॒नाना॑मभिभञ्जती॒नां जय॑न्तीनां म॒रुतो॑ य॒न्त्वग्र॑म्॥४०॥

    स्वर सहित पद पाठ

    इन्द्रः॑। आ॒सा॒म्। ने॒ता। बृह॒स्पतिः॑। दक्षि॑णा। य॒ज्ञः। पु॒रः। ए॒तु॒। सोमः॑। दे॒व॒से॒नाना॒मिति॑ देवऽसे॒नाना॑म्। अ॒भि॒भ॒ञ्ज॒ती॒नामित्य॑भिऽभञ्जती॒नाम्। जय॑न्तीनाम्। म॒रुतः॑। य॒न्तु॒। अग्र॑म् ॥४० ॥


    स्वर रहित मन्त्र

    इन्द्रऽआसान्नेता बृहस्पतिर्दक्षिणा यज्ञः पुर एतु सोमः । देवसेनानामभिभञ्जतीनाञ्जयन्तीनाम्मरुतो यन्त्वग्रम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    इन्द्रः। आसाम्। नेता। बृहस्पतिः। दक्षिणा। यज्ञः। पुरः। एतु। सोमः। देवसेनानामिति देवऽसेनानाम्। अभिभञ्जतीनामित्यभिऽभञ्जतीनाम्। जयन्तीनाम्। मरुतः। यन्तु। अग्रम्॥४०॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 40
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - युद्धामधे (अभिभज्जतीनाम्‌) शत्रूंच्या सेनेला चारी बाजूने घेरून मारणाऱ्या आणि (जयन्तीनाम्‌) त्यांवर विजय प्राप्त केल्यानंतर उत्साहित झालेल्या (आसाम्‌) या (देवसेनानाम्‌) सज्जनांच्या वा विद्वानांच्या सेनेचा (नेता) नायक (इन्द्र:) ऐश्‍वर्यशाली आणि सेनेचा प्रशिक्षक सेनापती सेनेच्या मागे (असावा) तर कधी तो (यज्ञ:) चटकन सर्वांच्या जवळ जाणारा अथवा (पुर:) सर्वांच्या अग्रभागी असावा. (बृहस्पति:) विशाल सेनेचा अथवा सर्व अधिकाऱ्यांचा अधिपती तो सेनापती (युद्धाच्या परिस्थिती व आवश्‍यकतेप्रमाणे) (दक्षिणा) कधी सैन्याच्या दक्षिण भागी असावा आणि (सोम:) सैन्याला प्रेरणा देण्यासाठी (एतु) त्याने कधी डाव्या बाजूलाही चालावे. (सेनापती युद्धनीतीप्रमाणे सर्वत्र संचार करणारा असावा) याशिवाय (मरूत:) वायुच्या वेगाप्रमाणे पुढे जाणारे वीर सैनिक (अग्रम्‌) सैन्याच्या अग्रभागी असावेत. ॥40॥

    भावार्थ - भावार्थ - जेव्हां राजा वा राजपुरुषांवर शत्रूविरुद्ध युद्ध करण्याचा प्रसंग येईल, त्यावेळी चारी बाजूंना योग्य सेनाधिकारी नेमावेत आणि त्यांच्या अधिपत्याखाली जे शूरवीर सैनिक असतील, त्यांना सैन्याच्या अग्रभागी ठेवावे. जे भयभीत होणारे (वा युद्धकलेत कमी प्रवीण) असतील त्याना सैन्याच्या मध्यभागी ठेवावे. त्या सर्वांच्या (अग्रस्थ व मध्यस्थ सेनेच्या) सोयीसाठी आवश्‍यक भोजन, आच्छादन, वाहन, अस्त्र-शस्त्र आदीची उचित व्यवस्था करावी आणि युद्धाचा आरंभ करावा. जर मूर्ख शिपायांची तुकडी (अल्पप्रशिक्षित वा अकुशल सैनिक-तुकडी) असेल, तर त्यावर एक चतुर शस्त्रविद्यानिपुण सैनिकाची तुकडी नेमावी. विद्वान लोकांनी नेहमी उपदेश करुन त्या अकुशल सेनेचा उत्साह वाढवावा. तसेच सेनाध्यक्ष आदी उच्च सैन्याधिकाऱ्यांनी युद्धासाठी पद्मव्यूह (चक्रव्यूह) आदीची योजना व साधना करावी आणि याप्रमाणे शत्रूशी लढावे. ॥40॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top