Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 33
    ऋषिः - अप्रतिरथ ऋषिः देवता - इन्द्रो देवता छन्दः - आर्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    आ॒शुः शिशा॑नो वृष॒भो न भी॒मो घ॑नाघ॒नः क्षोभ॑णश्चर्षणी॒नाम्। सं॒क्रन्द॑नोऽनिमि॒षऽए॑कवी॒रः श॒तꣳ सेना॑ऽअजयत् सा॒कमिन्द्रः॑॥३३॥

    स्वर सहित पद पाठ

    आ॒शुः। शिशा॑नः। वृ॒ष॒भः। न। भी॒मः। घ॒ना॒घ॒नः। क्षोभ॑णः। च॒र्ष॒णी॒नाम्। सं॒क्रन्द॑न॒ इति॑ स॒म्ऽक्रन्द॑नः। अ॒नि॒मि॒ष इत्य॑निऽमिषः। ए॒क॒वी॒र इत्ये॑कऽवी॒रः। श॒तम्। सेनाः॑। अ॒ज॒य॒त्। सा॒कम्। इन्द्रः॑ ॥३३ ॥


    स्वर रहित मन्त्र

    आशुः शिशानो वृषभो न भीमो घनाघनः क्षोभणश्चर्षणीनाम् । सङ्क्रन्दनो निमिषऽएकवीरः शतँ सेनाऽअजयत्साकमिन्द्रः ॥


    स्वर रहित पद पाठ

    आशुः। शिशानः। वृषभः। न। भीमः। घनाघनः। क्षोभणः। चर्षणीनाम्। संक्रन्दन इति सम्ऽक्रन्दनः। अनिमिष इत्यनिऽमिषः। एकवीर इत्येकऽवीरः। शतम्। सेनाः। अजयत्। साकम्। इन्द्रः॥३३॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 33
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे विद्वान मनुष्यांनो (राष्ट्रातील सुजाण व जबाबदार नागरिक हो), तुम्ही (अशा वीर पुरुषाला (सेनाधीश म्हणून निवडा की जो) (चर्षणीनाम्‌) सर्व मनुष्यांपैकी (शीघ्र कार्यकारी) अथवा सैन्यामधील सैनिकांपैकी जो (आशु:) शीघ्र काही (आक्रमण, प्रतिरोध, संचालन आदी कार्यात सर्वाधिक प्रवीण) आहे, तो (शिशान:) पदार्थांना सूक्ष्म करण्यात कुशल आहे अथवा जो (वृषभ:) वस्तूंना (ध्यायादींना) पायांनी तुडवणाऱ्या बैला (न) प्रमाणे (भीम:) भयंकर आहे आणि जो (घनाघन:) आवश्‍यक अनेल, तेव्हा शत्रूंचा विनाश करणारा (क्षोभण:) शत्रूंना कंपित करणारा, त्याना (संक्रन्दन:) रडविणारा आणि (अनिमिष:) रात्रंदिवस यत्नशील व जागरूक असणारा असा (एकवीर:) एकटाच-सर्वांहून वेगळा वीर पुरुष असेल, त्या (इन्द्र:) शत्रूसैन्याला विदीर्ण करणाऱ्या वीर पुरुषाला सैन्याधिपती नेमून आम्ही (साकम्‌) त्याच्या सह (शतम्‌) अनेक (सेना:) सैन्य तयार करून शत्रूला कैद करतो आणि त्याला ( आजयत्‌) जिंकतो. अशा पराक्रमी पुरुषालाच तुम्हीही सेनाधीश नेमा ॥33॥

    भावार्थ - भावार्थ - मनुष्यांनी (नागरिकांनी) हे कर्तव्य भावाने की त्यानी अशा रणशूरालाच सैन्याधीश नेमावे की जो धनुर्वेद आणि ऋग्वेद आदी शास्त्रांचा ज्ञाता आहे, निर्भय आणि सर्वविद्यापारंगत आहे. जो बलवान, धार्मिक असून आपल्या राजाच्या वा राष्ट्राध्यक्षांच्या राज्यावर प्रीती करणारा आहे, जो जितेंद्रिय, सदाविजयी आणि आपल्या सैन्याला सर्व (आवश्‍यक सैन्य शिक्षण) देण्यात व युद्धक्षेत्रात मार्गदर्शन करण्यात कुशल आहे. अशा वीर मनुष्यालाच नागरिकांनी सेनापतीपदावर नेमावे. ॥33॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top