Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 19
    ऋषिः - भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः देवता - विश्वकर्मा देवता छन्दः - भुरिगार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    2

    वि॒श्वत॑श्चक्षुरु॒त वि॒श्वतो॑मुखो वि॒श्वतो॑बाहुरु॒त वि॒श्वत॑स्पात्। सं बा॒हुभ्यां॒ धम॑ति॒ सं पत॑त्रै॒र्द्यावा॒भूमी॑ ज॒नय॑न् दे॒वऽएकः॑॥१९॥

    स्वर सहित पद पाठ

    वि॒श्वत॑श्चक्षु॒रिति॑ वि॒श्वतः॑ऽचक्षुः। उ॒त। वि॒श्वतो॑मुख॒ इति॑ वि॒श्वतः॑ऽमुखः। वि॒श्वतो॑बाहु॒रिति॑ वि॒श्वतः॑ऽबाहुः। उ॒त। वि॒श्वत॑स्पात्। वि॒श्वतः॑ऽपा॒दिति॑ वि॒श्वतः॑ऽपात्। सम्। बा॒हुभ्या॒मिति॑ बा॒हुऽभ्या॑म्। धम॑ति। सम्। पत॑त्रैः। द्यावा॒भूमी॒ इति॒ द्यावा॒भूमी॑। ज॒नय॑न्। दे॒वः। एकः॑ ॥१९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    विश्वतश्चक्षुरुत विश्वतोमुखो विश्वतोबाहुरुत विश्वतस्पात् । सम्बाहुभ्यान्धमति सम्पतत्रैर्द्यावाभूमी जनयन्देवऽएकः ॥


    स्वर रहित पद पाठ

    विश्वतश्चक्षुरिति विश्वतःऽचक्षुः। उत। विश्वतोमुख इति विश्वतःऽमुखः। विश्वतोबाहुरिति विश्वतःऽबाहुः। उत। विश्वतस्पात्। विश्वतःऽपादिति विश्वतःऽपात्। सम्। बाहुभ्यामिति बाहुऽभ्याम्। धमति। सम्। पतत्रैः। द्यावाभूमी इति द्यावाभूमी। जनयन्। देवः। एकः॥१९॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 19
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (तुम्ही या परमात्म्याचीच उपासना करीत जा की जो) (विश्‍वतश्‍चक्षु:) सर्व जगाला पाहणारा (सर्वत्र व्यापक असल्यामुळे सर्व पदार्थांचे ज्ञान असणारा) आहे, (उत) आणखीही जो (विश्‍वतोमुख:) सर्वांना सर्व प्रकारे उपदेश देणारा (प्रत्येकाच्या हृदयात कर्तव्य-अकर्तव्याचा विवेक ) आहे, जो (विश्‍वतोबाहु:) सर्वप्रकारे अनंत अपार शक्ती आणि पराक्रमाने युक्त आहे (उत) आणि जो परमेश्‍वर (विश्‍वतस्पात्‌) सर्वत्र व्यापक, अद्वितीय आणि पूर्णत्वाने आत्मनिर्भर असा (एक:) केवळ एकच (देव:) प्रकाशरुप परमेश्‍वर आहे. तोच (पतत्रै:) परमाणू आदीपासून (द्यावाभूमी) सूर्यलोक आणि पृथ्वीलोकाला (सं, जस्यन्‌) कार्य रुपाने प्रकट करतो आणि (कारणरूप प्रकृती परमाणूंपासून कार्य रुप जगाची उत्पत्ती करतो आणि आपल्या (बाहुभ्याम्‌) अनंत भक्ती-सामर्थ्याद्वारे साऱ्या विश्‍वाला (सं. धमति) सम्यकरीत्या व्यापून आहे. मनुष्यांनो, तुम्ही त्याच परमेश्‍वराला आपला रक्षककर्ता आणि उपास्यदेव माना. ॥19॥

    भावार्थ - भावार्थ- जो सूक्ष्माहून सूक्ष्म आहे, निराकार, अपार सामर्थ्यशाली, सर्वव्यापी, प्रकाशस्वरूप आणि अद्वितीय आहे, तोच परमेश्‍वर अतिसूक्ष्म कारण रुप (प्रकृति) पासून स्थूल कार्यरूप (व्यक्त) जगाची रचना करणारा आणि विनाश करणारा आहे. (केवळ तोच जगाची उत्पत्ती, पालन, विनाश आदी कार्ये करण्यात समर्थ आहे.) जो माणूस अशा गुणयुक्त परमेश्‍वराला सोडून अन्य कोणाची तरी उपासना करतो, त्याच्याहून अधिक दुर्देवी असा जगात कोण असेल, बरे? ॥19॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top