Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 9
    ऋषिः - मेधातिथिर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - निचृदार्षी गायत्री स्वरः - षड्जः
    2

    स नः॑ पावक दीदि॒वोऽग्ने दे॒वाँ२ऽइ॒हा व॑ह। उप॑ य॒ज्ञꣳ ह॒विश्च॑ नः॥९॥

    स्वर सहित पद पाठ

    सः नः॒। पा॒व॒क॒। दी॒दि॒व इति॑ दीदि॒ऽवः। अग्ने॑। दे॒वान्। इ॒ह। आ। व॒ह॒। उप॑। य॒ज्ञम्। ह॒विः। च॒। नः॒ ॥९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    स नः पावक दीदिवो ग्ने देवाँ इहाऽवह । उप यज्ञँ हविश्च नः ॥


    स्वर रहित पद पाठ

    सः नः। पावक। दीदिव इति दीदिऽवः। अग्ने। देवान्। इह। आ। वह। उप। यज्ञम्। हविः। च। नः॥९॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 9
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (पावक) पवित्र, (दीदिव:) तेजोमय अथवा रिपुदाहक आणि (अग्ने) सत्य-असत्याचे विवेचन व निर्णय करण्यास समर्थ असे हे विद्वान महाशय (स:) आपण वर वर्णन केलेल्या सद्गुणांनी संपन्न आहात. ज्याप्रमाणे हा भैतिक अग्नी (न:) आम्ही हवन केलेल्या उत्तम गुणयुक्त (औषधीयुक्त) (हवि:) हवनीय सुगंधित पदार्थांना प्राप्त करतो (स्वीकारतो) (द्रव्यांना भस्म करून त्यांचे गुण वाढवतो) त्याप्रमाणे (इह) आपणही या जगात (यज्ञम्‌) आमच्या गृहाश्रमरुप यज्ञाला (च) आणि (देवान्‌) त्यातील दिव्य सद्गुणांना व विद्वानांना (न:) आमच्याजवळ (उप, आ, वह) उत्तमप्रकारे आणा. (आमच्या स्वभावात उत्तम गुण येतील व आमच्या घरी विद्वज्जन येतील, असे करा.) ॥9॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे हा अग्नी आपल्या सूर्य आदी रुपाद्वारे (सूर्य अग्नीचाच एक रुप आहे) भूमीवरील सर्व पदार्थांचा रस वर आकाशात घेऊन जातो आणि त्याद्वारे वृष्टीसारखे श्रेष्ठ सुख भूमीला प्रदान करतो, तद्वत विद्वान लोकांनी विद्यारूप रसाचे ग्रहण करून त्यात वृद्धी करून सर्वांसाठी सुख निर्माण करावेत ॥9॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top