Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 17/ मन्त्र 20
    ऋषिः - भुवनपुत्रो विश्वकर्मा ऋषिः देवता - विश्वकर्मा देवता छन्दः - स्वराडार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    3

    किस्वि॒द्वनं॒ कऽउ॒ स वृ॒क्षऽआ॑स॒ यतो॒ द्यावा॑पृथि॒वी नि॑ष्टत॒क्षुः। मनी॑षिणो॒ मन॑सा पृ॒च्छतेदु॒ तद्यद॒ध्यति॑ष्ठ॒द् भुव॑नानि धा॒रय॑न्॥२०॥

    स्वर सहित पद पाठ

    किम्। स्वि॒त्। वन॑म्। कः। ऊँ॒ऽइत्यूँ॑। सः। वृ॒क्षः। आ॒स॒। यतः॑। द्यावा॑पृथि॒वी इति॒ द्यावा॑पृथि॒वी। नि॒ष्ट॒त॒क्षुः। नि॒स्त॒त॒क्षुरिति॑ निःऽतत॒क्षुः। मनी॑षिणः। मन॑सा। पृ॒च्छत॑। इत्। ऊँ॒ऽइत्यूँ॑। तत्। यत्। अ॒ध्यति॑ष्ठ॒दित्य॑धि॒ऽअति॑ष्ठत्। भुव॑नानि। धा॒रय॑न् ॥२० ॥


    स्वर रहित मन्त्र

    किँ स्विद्वनङ्कऽउ स वृक्षऽआस यतो द्यावापृथिवी निष्टतक्षुः । मनीषिणो मनसा पृच्छतेदु तद्यदध्यतिष्ठद्भुवनानि धारयन् ॥


    स्वर रहित पद पाठ

    किम्। स्वित्। वनम्। कः। ऊँऽइत्यूँ। सः। वृक्षः। आस। यतः। द्यावापृथिवी इति द्यावापृथिवी। निष्टतक्षुः। निस्ततक्षुरिति निःऽततक्षुः। मनीषिणः। मनसा। पृच्छत। इत्। ऊँऽइत्यूँ। तत्। यत्। अध्यतिष्ठदित्यधिऽअतिष्ठत्। भुवनानि। धारयन्॥२०॥

    यजुर्वेद - अध्याय » 17; मन्त्र » 20
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे (मनीषिण:) मनाचा निग्रह करणाऱ्या योगीजन हो, (अथवा जिज्ञासा असणाऱ्या मनुष्यांनो) तुम्ही (मनसा) ज्ञान प्राप्त करण्याच्या दृष्टीने विद्वज्जनांना विचारा विसी (किं, स्वित्‌) कोण आहे की जो (वनम्‌) (जगाचे) कारणरुप असून सेवनीय वा उपासनीय आहे? (क:) (उ) निश्‍चयपूर्वक सांगा की कोण-----(स:) तो (वृक्ष:) विद्यमान अनित्य कार्यरुप संसार (आस) कसा आहे? (पृच्छत) तसेच तुम्ही जिज्ञासूजनांनी विद्वानाला विचारावे की (यत:) ज्यापासून हा विशाल सूर्य आणि पृथ्वीलोक (विष्टुतक्षु:) उत्पन्न झाले आहे (तो कोण आहे?) मग ते उत्तर देतील की (यत्‌) जो (भुवनानि) प्राण्यांच्या निवासाची ठिकाणे म्हणजे लोक-लोकांतरांना (धारयन्‌) रायू, विद्युत आणि सूर्यादींच्या साहाय्याने धारण करून (अध्यातिष्ठत्‌) सर्वांचा आधार व अधिष्ठाता आहे, (वत्‌) तो (इत्‌) आणि त्याच (उ) प्रख्यात ब्रह्माला या सर्वांचा कर्ता, उत्पत्तिकर्ता जाणा ॥20॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्राच्या चार चरणांपैकी पहिल्या तीन चरणांत प्रश्‍न विचारले असून अंतिम चरणात, त्या प्रश्‍नांचे उत्तर सांगितले आहे. मंत्रातील ‘वृक्ष’ वा शब्दाने कार्य आणि ‘वन’ या शब्दाने कारणाचे सूचित केले आहे. ज्याप्रमाणे पृथ्वी सर्व पदार्थांना धारण करते (सर्वांसाठी आधार आहे) तसेच पृथ्वीला सूर्याचा, सूर्याला विद्युतेचा आणि विद्युतेला वायूचा आधार आहे, त्याप्रमाणे परमेश्‍वर या सर्वांचा धारण करतो म्हणजे तो सर्वाधार आहे. ॥20॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top