Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 33/ मन्त्र 1
    ऋषिः - वत्सप्रीर्ऋषिः देवता - अग्नयो देवताः छन्दः - स्वराट् पङ्क्तिः स्वरः - पञ्चमः
    6

    अ॒स्याजरा॑सो द॒माम॒रित्रा॑ऽअ॒र्चद्धू॑मासोऽअ॒ग्नयः॑पाव॒काः।श्वि॒ती॒चयः॑ श्वा॒त्रा॒सो॑ भुर॒ण्यवो॑ वन॒र्षदो॑ वा॒यवो॒ न सोमाः॑॥१॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒स्य। अ॒जरा॑सः। द॒माम्। अ॒रित्राः॑। अ॒र्चद्धू॑मास॒ इत्य॒र्चत्ऽधू॑मासः। अ॒ग्नयः॑। पा॒व॒काः ॥ श्वि॒ती॒चयः॑। श्वात्रासः॑। भु॒र॒ण्यवः॑। व॒न॒र्षदः॑। व॒न॒सद॒ इति॑ वन॒ऽसदः॑। वा॒यवः॑। न। सोमाः॑ ॥१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अस्याजरासो दमामरित्राऽअर्चद्धूमासोऽअग्नयः पावकाः । श्वितीचयः श्वात्रासो भुरण्यवो वनर्षदो वायवो न सोमाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    अस्य। अजरासः। दमाम्। अरित्राः। अर्चद्धूमास इत्यर्चत्ऽधूमासः। अग्नयः। पावकाः॥ श्वितीचयः। श्वात्रासः। भुरण्यवः। वनर्षदः। वनसद इति वनऽसदः। वायवः। न। सोमाः॥१॥

    यजुर्वेद - अध्याय » 33; मन्त्र » 1
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अस्य) पूर्वीच्या (३२ व्या) अध्यायात वर्णन केलेल्या ईश्‍वराच्या सृष्टीत (अजरासः) एका-वा समान वयाचे म्हणजे (अग्नी, वायू आदी एका वयाचे, एका अवस्थेचे) आहेत. ते (अरित्राः) अग्नी आदी पदार्थ अथवा घरें शत्रूपासून रक्षा करणारे तसेच (अर्चद्धूमासः) ज्या घरांत सुवासिक धूर घुमत आहे अशी घरें अथवा अग्नी, वायू सुगंध वाहून नेणारे, प्रसृत करणारे आहेत. (पावका) दोन्ही पवित्रताकारक असून (श्‍वितीचयः) श्‍वेतवर्ण संचित करणारे आहेत दोन्ही (अग्नी आदी पदार्थ व घरें) (श्‍वात्रासः) धनवृद्धीचे कारण असून (भुरण्यवः) घराविषयी धारण करणारे, आश्रय देणारे आणि अग्नी वायू गमनशील आहेत. दोन्ही (सोमाः) ऐश्‍वर्य देणारे आहेत ते (ग्नयः) अग्नी, विद्युत आदी शक्ती (वनर्षदः) वनात वा सूर्य किरणात राहणार्‍या (वायवः) वायू (न) प्रमाणे (दमाम्) घराला धारण करतात (अग्नी व विद्युत, वायू आदीमुळे घरात राहणे शक्य आहे) हे मनुष्यांनो, तुम्ही अशा अग्नी, विद्युत शक्ती विषयी ज्ञान वाढवा ॥1॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. जर मनुष्यांनी अग्नी, वायू आदी सृष्टीतील पदार्थांविषयी ज्ञान वा त्यांचे विज्ञान जाणून घेतले, तर ते त्या पदार्थापासून भरपूर लाभ मिळवू शकतात ॥1॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top