Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 12
    ऋषिः - हैमवर्चिर्ऋषिः देवता - विद्वांसो देवता छन्दः - भुरिगनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    दे॒वा य॒ज्ञम॑तन्वत भेष॒जं भि॒षजा॒श्विना॑। वा॒चा सर॑स्वती भि॒षगिन्द्रा॑येन्द्रि॒याणि॒ दध॑तः॥१२॥

    स्वर सहित पद पाठ

    दे॒वाः। य॒ज्ञम्। अ॒त॒न्व॒त॒। भे॒ष॒जम्। भि॒षजा॑। अ॒श्विना॑। वा॒चा। सर॑स्वती। भि॒षक्। इन्द्रा॑य। इ॒न्द्रि॒याणि॑। दध॑तः ॥१२ ॥


    स्वर रहित मन्त्र

    देवा यज्ञमतन्वत भेषजम्भिषजाश्विना । वाचा सरस्वती भिषगिन्द्रायेन्द्रियाणि दधतः ॥


    स्वर रहित पद पाठ

    देवाः। यज्ञम्। अतन्वत। भेषजम्। भिषजा। अश्विना। वाचा। सरस्वती। भिषक्। इन्द्राय। इन्द्रियाणि। दधतः॥१२॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 12
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे (इन्द्रियाणि नेत्र आदी विषयग्राहक इंद्रियें (दधतः) धारण करणारी आणि (भिषक) वैद्यकशास्त्र उत्तमप्रकारे जाणणारी, चिकित्साशास्त्राच्या सर्व अंगांची माहिती असणारी (सरस्वती) वैद्यकशास्त्रसंपन्न विदुषी नारी (औषधी व प्रयोग यांना पूर्णपणे जाणते) तसेच (भिवजा) आयुर्वेदाचे विद्वान (अश्विना) औषधिविज्ञानाचे ज्ञाता दोन श्रेष्ठ वैद्य आणि पूर्वी वर्णिलेली विदुषी वैद्य नारी, हे तिघे तसेच (देवाः) श्रेष्ठ ज्ञानीजन आपल्या (वाचा) (मधुर व प्रभावी) वाणीने (इन्द्रियाय) समाजाच्या परमेश्वर्यासाठी (भेषजम्‌) रोगविनाशक औषधीरूप (यज्ञम्‌) यज्ञ (अतन्वत) करतात, त्याप्रमाणे तुम्ही सर्व सामान्यजन देखील करत जा. (कुशल वैद्य, निष्णात वैद्यनारी, औषधीविज्ञानी, श्रेष्ठजन हे सर्वजण गोड भाषा बोलत लोकांच्या आरोग्यासाठी यत्न करतात, त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा आणि इतरांनाही नीरोग राहण्यास साहाय्य करावे) ॥12॥

    भावार्थ - भावार्थ - जोपर्यंत लोक पथ्य सांभाळून औषधी सेवन करीत नाहीत, आणि ब्रह्मचर्याचे पालन करीत शरीराचे आरोग्य, बळ आणि बुद्धी, यांची वृद्धी करीत नाहीत, तोपर्यंत सुखाची प्राप्ती कदापी करू शकत नाहीत. ॥12॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top