यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 25
ऋषिः - हैमवर्चिर्ऋषिः
देवता - सोमो देवता
छन्दः - भुरिगनुष्टुप्
स्वरः - गान्धारः
7
अ॒र्ध॒ऽऋ॒चैरु॒क्थाना॑ रू॒पं प॒दैरा॑प्नोति नि॒विदः॑। प्र॒ण॒वैः श॒स्त्राणा॑ रू॒पं पय॑सा॒ सोम॑ऽआप्यते॥२५॥
स्वर सहित पद पाठअ॒र्द्ध॒ऽऋ॒चैरित्य॑र्द्धऽऋ॒चैः। उ॒क्थाना॑म्। रू॒पम्। प॒दैः। आ॒प्नो॒ति॒। नि॒विद॒ इति॑ नि॒ऽविदः॑। प्र॒ण॒वैः। प्र॒न॒वैरिति॑ प्रऽन॒वैः। श॒स्त्राणा॑म्। रू॒पम्। पय॑सा। सोमः॑। आ॒प्य॒ते॒ ॥२५ ॥
स्वर रहित मन्त्र
अर्धऋचौरुक्थानाँ रूपम्पदैराप्नोति निविदः । प्रणवैः शस्त्राणाँरूपम्पयसा सोम आप्यते ॥
स्वर रहित पद पाठ
अर्द्धऽऋचैरित्यर्द्धऽऋचैः। उक्थानाम्। रूपम्। पदैः। आप्नोति। निविद इति निऽविदः। प्रणवैः। प्रनवैरिति प्रऽनवैः। शस्त्राणाम्। रूपम्। पयसा। सोमः। आप्यते॥२५॥
विषय - अध्यापक कसे असावेत, यावषियी -
शब्दार्थ -
शब्दार्थ - जे विद्वान (अर्द्धऋचै) यांच्या अर्धभागाने (उक्थानाम्) कथनीय अथवा व्यक्तव्य (रूपम्) संपूर्ण आशय (जाणून घेतात) तसेच (पदैः) सुबन्त, तिङ्न्त पदांद्वारा (प्रथमा ते सप्तमी विभक्तीपर्यंतचे शब्दरूप, धातुरूप) आणि (प्रणवैः) ओंकाराद्वारा (शास्त्राणाम्) शस्त्रांचे (रूपम्) स्वरूप (जाणून घेतात) तसेच जो विद्वान (निविदः) जे जे पदार्थ निश्चयाने अवश्यमेव प्राप्त होणारे आहेत, त्यांना (आप्नोति) प्राप्त करतो अथवा जो विद्वान (पयसा) जलाबरोबर (सोमः) सोम औषधी चारस (आप्यते) प्राप्त करतो (पाण्यात सोम आदी औषधी कुटून त्यातील रस काढण्याचा विधी जाणतो) तोच विद्वान वेदज्ञ म्हणविला जातो. (वेदांचे अध्ययन करणाऱ्याने अर्ध्या मंत्राने पूर्ण आशय जाणून घेण्याची कला अवगत करावी. शब्दाने शस्त्रांचे प्रभावी रूप ओळखले पाहिजे आणि सोमरस तयार करण्याची रीत जाणली पाहिजे) ॥25॥
भावार्थ - भावार्थ - जे लोक वेदज्ञ विद्वानाजवळ बसून, त्यापासून वेद शिकून शब्द, वाक्य, मंत्र, विभाग आदीचे ज्ञान प्राप्त करतात आणि विद्वाज्जन शब्द आणि अर्थाचा संबंध ज्याप्रकारे करतात, त्याप्रकारे शब्दार्थ विद्या शिकलेले असतात, तेच लोक अध्यापक होण्यास पात्र आहेत, असे जाणावे. ॥25॥
इस भाष्य को एडिट करेंAcknowledgment
Book Scanning By:
Sri Durga Prasad Agarwal
Typing By:
N/A
Conversion to Unicode/OCR By:
Dr. Naresh Kumar Dhiman (Chair Professor, MDS University, Ajmer)
Donation for Typing/OCR By:
N/A
First Proofing By:
Acharya Chandra Dutta Sharma
Second Proofing By:
Pending
Third Proofing By:
Pending
Donation for Proofing By:
N/A
Databasing By:
Sri Jitendra Bansal
Websiting By:
Sri Raj Kumar Arya
Donation For Websiting By:
N/A
Co-ordination By:
Sri Virendra Agarwal