Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 19/ मन्त्र 81
    ऋषिः - शङ्ख ऋषिः देवता - वरुणो देवता छन्दः - भुरिक् त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    4

    तद॑स्य रू॒पम॒मृत॒ꣳ शची॑भिस्ति॒स्रो द॑धु॒र्दे॒वताः॑ सꣳररा॒णाः। लोमा॑नि॒ शष्पै॑र्बहु॒धा न तोक्म॑भि॒स्त्वग॑स्य मा॒सम॑भव॒न्न ला॒जाः॥८१॥

    स्वर सहित पद पाठ

    तत्। अ॒स्य॒। रू॒पम्। अ॒मृत॑म्। शची॑भिः। ति॒स्रः। द॒धुः॒। दे॒वताः॑। स॒ꣳर॒रा॒णा इति॑ सम्ऽररा॒णाः। लोमा॑नि। शष्पैः॑। ब॒हु॒धा। न। तोक्म॑भि॒रिति॒ तोक्म॑ऽभिः। त्वक्। अ॒स्य॒। मा॒सम्। अ॒भ॒व॒त्। न। ला॒जाः ॥८१ ॥


    स्वर रहित मन्त्र

    तदस्य रूपममृतँ शचीभिस्तस्रो दधुर्देवताः सँरराणाः । लोमानि शष्पैर्बहुधा न तोक्मभिस्त्वगस्य माँसमभवन्न लाजाः ॥


    स्वर रहित पद पाठ

    तत्। अस्य। रूपम्। अमृतम्। शचीभिः। तिस्रः। दधुः। देवताः। सꣳरराणा इति सम्ऽरराणाः। लोमानि। शष्पैः। बहुधा। न। तोक्मभिरिति तोक्मऽभिः। त्वक्। अस्य। मासम्। अभवत्। न। लाजाः॥८१॥

    यजुर्वेद - अध्याय » 19; मन्त्र » 81
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (संराराणाः) भरपूर देणारे (तिस्रः) (देवताः) अध्यापन करणारे, अध्ययन करणारे आणि परीक्षा घेणारे हे असे जे तीन विद्वान आहेत, ते (शचीभिः) उत्तम प्रज्ञा आणि कर्मांसह (नीट विचार करून आणि व्यवस्थित आयोजन करून) (बहुधा) अनेक प्रकारचे यज्ञ करतात त्यावेळी ते (शष्पैः) लांब लांब केस आणि (लोमानि) शरीरावर रोम (दधुः) धारण करावेत (याज्ञिक जनांनी केस, दाढी आदी वाढविलेले उत्तम) (तत्‌) त्या (अस्य) या यज्ञाच्या (अमृतम्‌) नाशरहित (रूपम्‌) स्वरूप तुम्ही ओळखा (यज्ञाचे महत्व जाणून घ्या) या यज्ञ (तोक्मभिः) बालकांद्वारे (न) आयोजित वा संपन्न करणे शक्य नाही. (उपनयन न झालेल्या व लहान मुलांनी यज्ञ करूं नये, कारण त्याचे विधि-नियम ते पाळू शकत नाहीत) तसेच (अस्य) या यज्ञात (त्वक्‌) कोणत्याही प्रकारची त्वचा (मांसम्‌) मांस, अथवा (लाजाः) भाजलेले कोरडे धान्य (लाह्या आदी) होम करण्यास योग्य (न, अभवत्‌) नाही. (यज्ञात मांस, त्वचा आदींची आहुती देऊ नये, तसेच चामड्याच्या वस्तू वापरू नये) हे नियम हे मनुष्यांनो, तुम्ही जाणून घ्या. ॥81॥

    भावार्थ - भावार्थ - दाढी-मिशा (व डोक्यावरील लांब केस) ज्यांनी ठेवले आहेत, ते ब्रह्मचारी अथवा पूर्ण विद्यावान जितेंद्रिय भद्रजनच (‘यज्ञ` शब्दातील) ‘यज्‌) धातूचा खरा अर्थ जाणू शकतात व तेच यज्ञ करण्याचे अधिकारी आहेत, अन्य बालक वा बालबुद्धी असलेले (अशिक्षित जन) यज्ञाचा खरा अर्थ जाणू शकत नाहीत. तसेच या हवनरूप यज्ञात मांस, क्षार, आंबट असे पदार्थ अथवा तिखट आदी गुणरहित पदार्थ टाकू नये. सुगंधियुक्त, पुष्टिकारक, मिष्ट आणि रोगनाशकादी गुणांनी युक्त पदार्थ, हवनात आहुती देण्यासाठी योग्य पदार्थ आहेत, हे सर्वांनी जाणून घ्यावे. ॥81॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top