Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 58
    ऋषिः - मधुच्छन्दा ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - भुरिगुपरिष्टाद् बृहती स्वरः - मध्यमः
    3

    सं वां॒ मना॑सि॒ सं व्र॒ता समु॑ चि॒त्तान्याक॑रम्। अग्ने॑ पुरीष्याधि॒पा भ॑व॒ त्वं न॒ इष॒मूर्जं॒ यज॑मानाय धेहि॥५८॥

    स्वर सहित पद पाठ

    सम्। वा॒म्। मना॑सि। सम्। व्र॒ता। सम्। ऊँ॒ इत्यूँ॑। चि॒त्तानि॑। आ। अ॒क॒र॒म्। अग्ने॑। पु॒री॒ष्य॒। अ॒धि॒पा इत्य॑धि॒ऽपाः। भ॒व॒। त्वम्। नः॒। इष॑म्। ऊर्ज॑म्। यज॑मानाय। धे॒हि॒ ॥५८ ॥


    स्वर रहित मन्त्र

    सँवाम्मनाँसि सँव्रता समु चित्तान्याकरम् । अग्ने पुरीष्याधिपा भव त्वन्न इषमूर्जँयजमानाय धेहि ॥


    स्वर रहित पद पाठ

    सम्। वाम्। मनासि। सम्। व्रता। सम्। ऊँ इत्यूँ। चित्तानि। आ। अकरम्। अग्ने। पुरीष्य। अधिपा इत्यधिऽपाः। भव। त्वम्। नः। इषम्। ऊर्जम्। यजमानाय। धेहि॥५८॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 58
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (आचार्य म्हणतात) हे स्त्रियांनो आणि पुरुषांनो, जसे मी तुमचा आचार्य (वाम्‌) तुम्हां दोघांना (पति, पत्नीला) (संमनांकि) एका धर्मात तसेच अंत:करणाच्या संकल्प-विकल्पात्मक वृत्तीमध्ये गुंतविता, (सेव्रता) तुम्हाला सत्यभाषणादी व्रतामध्ये (उ) आणि (सम्‌, चित्तानि) सम्यक ज्ञान (विचारपूर्वक ठरवलेल्या) कर्मामधे (आ) (अकरम्‌) चांगल्याप्रकारे युक्त करतो (धर्म, चित्तवृत्ती आणि कर्म, यांमध्ये एकत्रित करतो) तुम्ही त्याप्रमाणे वागून माझे प्रिय व्हा. (यानंतर पति-पत्नी आचार्य वा राजाला म्हणतात) हे (अग्न्रे) उपदेशक आचार्य अथवा (पुरीष्य) रक्षण करण्यात समर्थ असे हे राजन्‌, (त्वम्‌) आपण (न:) आम्हा गृहाश्रमी स्त्री-पुरुषांचे (अधिपा:) रक्षक (भव) व्हा आणि (यजमानाय) धर्मानुसार वागणाऱ्या स्त्री आणि पुरुषाला (इपय्‌) अन्न आदी उत्तम पदार्थ आणि (अर्जम्‌) शारीरिक व आत्मिकशक्ती (धेहि) प्रदान करा (आम्हांस पुष्कळ अन्न आणि शक्ती द्या) ॥58॥

    भावार्थ - भावार्थ - उपदेशक आचार्य, अध्यापक आदीना पाहिजे की त्यांनी सर्व मनुष्यांच्या धर्म (गुण, कर्म, स्वभाव) आणि चित्तवृत्तीचा विचार करून त्याप्रमाणे समानवृत्ती, सुख किंवा दु:ख यांचे साम्य पाहून त्यानुसार विद्या-ज्ञान द्यावे. तसेच सर्व स्त्री-पुरुषांचेही कर्तव्य आहे की आप्त विद्वान व्यक्तीलाच उपदेशक आणि अध्यापक म्हणून स्वीकारावे आणि त्यांच्या संगतीत रहावे. उपदेशक आचार्यांनी त्यांच्या ऐश्‍वर्य-पराक्रमाची वृद्धी करावी. (तसेच हे लक्षात ठेवावे की) एकचित्त, एकधर्म आदी साम्य असल्याशिवाय आत्म्यात मैत्री होत नाही आणि मैत्री असल्याशिवाय सदैव निरंतर सुख मिळू शकत नाही.) ॥58॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top