Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 66
    ऋषिः - विश्वावसुर्ऋषिः देवता - अग्निर्देवता छन्दः - विराडार्षी त्रिष्टुप् स्वरः - धैवतः
    1

    नि॒वेश॑नः स॒ङ्गम॑नो॒ वसू॑नां॒ विश्वा॑ रू॒पाभिच॑ष्टे॒ शची॑भिः। दे॒वऽइ॑व सवि॒ता स॒त्यध॒र्मेन्द्रो॒ न त॑स्थौ सम॒रे प॑थी॒नाम्॥६६॥

    स्वर सहित पद पाठ

    नि॒वेश॑न॒ इति॑ नि॒ऽवेश॑नः। स॒ङ्गम॑न॒ इति॑ स॒म्ऽगम॑नः। वसू॑नाम्। विश्वा॑। रू॒पा। अ॒भि। च॒ष्टे॒। शची॑भिः। दे॒व इ॒वेति॑ दे॒वःऽइ॑व। स॒वि॒ता। स॒त्यध॒र्मेति॑ स॒त्यऽध॑र्मा। इन्द्रः॑। न। त॒स्थौ॒। स॒म॒र इति॑ सम्ऽअ॒रे। प॒थी॒नाम् ॥६६ ॥


    स्वर रहित मन्त्र

    निवेशनः सङ्गमनो वसुनाँविश्वा रूपाभि चष्टे शचीभिः । देवऽइव सविता सत्यधर्मेन्द्रो न तस्थौ समरे पथीनाम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    निवेशन इति निऽवेशनः। सङ्गमन इति सम्ऽगमनः। वसूनाम्। विश्वा। रूपा। अभि। चष्टे। शचीभिः। देव इवेति देवःऽइव। सविता। सत्यधर्मेति सत्यऽधर्मा। इन्द्रः। न। तस्थौ। समर इति सम्ऽअरे। पथीनाम्॥६६॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 66
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - तोच पुरुष वा तीच स्त्री गृहाश्रमासाठी पात्र आहे की जे (सत्यधर्मा) सत्य धर्म नियमांप्रमाणे वागणारे आहेत. (देव इन) सत्यधर्मा परमेश्‍वर जसा सर्वांचा साधी आहे, त्याप्रमाणे जो (निवेशन:) स्त्रीचा खरा व प्रामाणिक साथी आहे, जो (सड्नमन:) तिच्यासह गती-प्रगती करतो, तोच पुरुष गृहस्थी होण्यास पात्र आहे. तसेच जो आपल्या (शचीभि:) बुद्धीने व कर्माने (वसूनाम्‌) पृथ्वीवरील पदार्थांच्या (विश्‍वा) सर्व (रूपा) रुपांना, गुण-अवगुणांना (अभिचष्टे) पाहतो आणि जाणतो, तसेच जो पुरुष (इन्द्र:) (न) सूर्याप्रमाणे (समरे) युद्धात (पथीनाम्‌) सोबत चालणाऱ्या साथी माणसांच्यासमोर (तस्थौ) धीटपणे उभा राहतो (सोबतीचे वा सैनिकांचे नेतृत्व करतो), तोच पुरुष गृहाश्रमी होण्यास पात्र मानावा. ॥66॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात दोन उपमा अलंकार आहेत. मनुष्यांकरिता उचित आवश्‍यक आहे की ज्याप्रमाणे ईश्‍वर. सर्वांच्या कल्याणासाठी कारणरुप प्रकृतीपासून कार्यरूप अनेक पदार्थांची रचना करतो, (त्याप्रमाणे मनुष्यांनी इतरांच्या कल्याणासाठी झटावे) सूर्य. जसा ढगांशी युद्ध करून जगावर उपकार करतो, तद्वत मनुष्यांनी रचना, क्रम, क्रिया, विज्ञान आदीद्वारे सर्वांच्या सोयीचे अनेक कार्य सिद्ध करावेत. आणि सर्व लोकांना सुखी करावे ॥66॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top