Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 79
    ऋषिः - भिषगृषिः देवता - वैद्यो देवता छन्दः - अनुष्टुप् स्वरः - गान्धारः
    2

    अ॒श्व॒त्थे वो॑ नि॒षद॑नं प॒र्णे वो॑ वस॒तिष्कृ॒ता। गो॒भाज॒ऽइत् किला॑सथ॒ यत् स॒नव॑थ॒ पूरु॑षम्॥७९॥

    स्वर सहित पद पाठ

    अ॒श्व॒त्थे। वः॒। नि॒षद॑नम्। नि॒सद॑न॒मिति॑ नि॒ऽसद॑नम्। प॒र्णे। वः॒। व॒स॒तिः। कृ॒ता। गो॒भाज॒ इति॑ गो॒ऽभाजः॑। इत्। किल॑। अ॒स॒थ॒। यत्। स॒नव॑थ। पूरु॑षम्। पुरु॑ष॒मिति॒ पुरु॑षम् ॥७९ ॥


    स्वर रहित मन्त्र

    अश्वत्थे वो निषदनम्पर्णे वो वसतिष्कृता । गोभाजऽइत्किलासथ यत्सनवथ पूरुषम् ॥


    स्वर रहित पद पाठ

    अश्वत्थे। वः। निषदनम्। निसदनमिति निऽसदनम्। पर्णे। वः। वसतिः। कृता। गोभाज इति गोऽभाजः। इत्। किल। असथ। यत्। सनवथ। पूरुषम्। पुरुषमिति पुरुषम्॥७९॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 79
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (मनुष्यांना उपदेश केला आहे) हे मनुष्यांनो, विचार करा की (यत्‌) ज्यायोगे (व:) तुमचे (निषदनम्‌) निवास (वा अस्तित्व) (अश्‍वत्थे) उद्या आहे किंवा नाही अशा अनिश्‍चित (क्षणभंगुर) शरीरात आहे आणि (पर्णे) कमळाच्या पानावर जलबिंदुप्रमाणे चंचल व अस्थिर असलेल्या संसारामधे ईश्‍वराने (व:) तुमचे (वसति:) वास्तव्य (कृता) केले आहे. (तुमचे जीवन क्षणभंगुर जगात जलबिंदुप्रमाणे नाशवान केले आहे) त्यामुळे (गोभाज:) या जगात येऊन पृथ्वीवरील पदार्थांचे यथोचित सेवन करीन (किल) अवश्‍यमेव (पुरुषम्‌) अन्नादी सेवनाद्वारे पालित पोषित या देहाला (सनवथ) औषधीं आदी द्वारा निरोगी ठेवा आणि सुख प्राप्त करून (इत्‌) या संसारात (असथ) समाधानी होऊन रहा ॥69॥

    भावार्थ - भावार्थ - माणसाने नेहमी विचार करावा की आपले हे शरीर अनित्य आणि त्याची जगात स्थिती चलायमान आहे. यामुळे या अमूल्य शरीराची रोगांच्या आक्रमणापासून रक्षा करावी. त्याद्वारे धर्म, अर्थ, काम आणि मोक्षासाठी शीघ्रत: यत्न करावेत. अनित्य साधनांद्वारे नित्य मोक्षाचे सुख संपादित करावे. ज्याप्रमाणे औषधी (वृक्ष, वनस्पती, लता आदी) फळे, फुलें, पाने, बुंधा शाखा आदी अवयवांनी सुशोभित होतात, तद्वत माणसांनी (स्वस्थ अवयवी असलेल्या) नीरोग शरीराने सुशोभित व्हावे ॥79॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top