Loading...

मन्त्र चुनें

  • यजुर्वेद का मुख्य पृष्ठ
  • यजुर्वेद - अध्याय 12/ मन्त्र 65
    ऋषिः - मधुच्छन्दा ऋषिः देवता - यजमानो देवता छन्दः - आर्षी जगती स्वरः - निषादः
    5

    यं ते॑ दे॒वी निर्ऋ॑तिराब॒बन्ध॒ पाशं॑ ग्री॒वास्व॑विचृ॒त्यम्। तं ते॒ विष्या॒म्यायु॑षो॒ न मध्या॒दथै॒तं पि॒तुम॑द्धि॒ प्रसू॑तः। नमो॒ भूत्यै॒ येदं च॒कार॑॥६५॥

    स्वर सहित पद पाठ

    यम्। ते॒। दे॒वी। निर्ऋ॑ति॒रिति॒ निःऽऋ॑तिः। आ॒ब॒बन्धेत्या॑ऽब॒बन्ध॑। पाश॑म्। ग्री॒वासु॑। अ॒वि॒चृ॒त्यमित्य॑विऽचृ॒त्यम्। तम्। ते॒। वि। स्या॒मि॒। आयु॑षः। न। मध्या॑त्। अथ॑। ए॒तम्। पि॒तुम्। अ॒द्धि॒। प्रसू॑त॒ इति॒ प्रऽसू॑तः। नमः॑। भूत्यै॑। या। इ॒दम्। च॒कार॑ ॥६५ ॥


    स्वर रहित मन्त्र

    यन्ते देवी निरृतिराबबन्ध पाशम्ग्रीवास्वविचृत्यम् । तन्ते वि ष्याम्यायुषो न मध्यादथैतम्पितुमद्धि प्रसूतः । नमो भूत्यै येदं चकार ॥


    स्वर रहित पद पाठ

    यम्। ते। देवी। निर्ऋतिरिति निःऽऋतिः। आबबन्धेत्याऽबबन्ध। पाशम्। ग्रीवासु। अविचृत्यमित्यविऽचृत्यम्। तम्। ते। वि। स्यामि। आयुषः। न। मध्यात्। अथ। एतम्। पितुम्। अद्धि। प्रसूत इति प्रऽसूतः। नमः। भूत्यै। या। इदम्। चकार॥६५॥

    यजुर्वेद - अध्याय » 12; मन्त्र » 65
    Acknowledgment

    शब्दार्थ -
    शब्दार्थ - (पत्नी पतीस म्हणते) हे पति, (निर्ऋति:) श्री पृथ्वीप्रमाणे (प्रतिज्ञेत) दृढ असून (ते) तुमच्या (ग्रीवासु) गळयात मी (अविचृत्यम्‌) कधीही न सुटणारे असे (यम्‌) (पाशम्‌) धर्ममय बंधन (आबबन्ध) विवाहसमी बांधत आहे (तम्‌) त्याप्रकारचे बंधन (ते) तुमच्यासाठी देखील आवश्‍यक करीत आहे. (आयुषा) जीवनाचे जे साधन म्हणजे अन्न, त्या (न) अन्नासह मी तुमच्या (गृहस्थ) जीवनात (विस्मामि) प्रवेश करीत आहे. (अथ) यानंतर (मध्यात्‌) जीवनामध्ये मी आणि तुम्ही कोणीही (विवाहप्रसंगी केलेल्या प्रतिज्ञेपासून) विचलित होणार नाही. ज्याप्रमाणे मी (एतम्‌) (पितुम्‌) या अन्न आदी पदार्थांचे सेवन करते, त्याप्रमाणे (प्रसूत:) (यागृहस्थाश्रमात माझ्यासाठी) जन्म घेतलेले तुम्ही या अन्नादींचे सेवन करा. (पती म्हणतो) हे पत्नी, (या) जी तू (देवी) दिव्य गुणवती आहेस, तू देखील (इदम्‌) या पतिव्रतधर्माचा धर्म म्हणून स्वीकार केल्यानंतर त्या नियमांचे सदैव (चकार) पालन कर. (भूत्यै) तू माझ्याकरिता ऐश्‍वर्य प्रदान करणार आहेस. मी तुझ्याकरिता आवश्‍यक त्या (नम:) अन्नादी पदार्थांची व्यवस्था करीन ॥65॥

    भावार्थ - भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. विवाहसमयीं पति-पत्नी व्यभिचारापासून दूर राहण्याच्या ज्या प्रतिज्ञा करतात, दोघांनी पुढे कधीही त्या नियमाचा भंग होऊ देऊ नये. कारण की विवाहप्रसंगी पुरुष जेंव्हा स्त्रीचा हात आपल्या हातात घेतो, त्याचक्षणीं पुरुषाचे सर्व पदार्थ स्त्रीचे होतात आणि जे जे पदार्थ स्त्रीचे आहेत, ते त्या पुरुषाचे (पतीचे) होतात. असा प्रघात आहे. जर कोणी पुरुष आपल्या विवाहित स्त्रीला सोडून परस्त्रीचा संग करील अथवा कोणी स्त्री परपुरुषाची कामना करील, तर दोघेही चोराप्रमाणे पापी आहेत, असे समजावे. यामुळे आपल्या पत्नीच्या संमती व सहमतीशिवाय पुरुषाने आणि आपल्या पतीच्या आज्ञेशिवाय पत्नीने कोणतेही कार्य करू नये. असे वागणे हेच स्त्री-पुरुषांमध्ये प्रीती निर्माण करणारे ठरते. यासाठी पति-पत्नींनी सदा सर्वदा व्यभिचाराचा त्याग करावा ॥65॥

    इस भाष्य को एडिट करें
    Top